आम्ही गोखले एज्युकेशन सोसायटीच्या श्री जयरामभाई हायस्कूलचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर सभासद महाराष्ट्राच्या शिक्षण खात्याने घालून दिलेल्या नियमांच्या अधिन राहून विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिक्षण देण्यासाठी बांधील आहोत. हे करतांना आम्ही विद्यार्थ्यांच्या गरजा व अपेक्षा त्याचप्रमाणे पालक आणि संस्थेच्या अपेक्षा लक्षात घेऊ. विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या नेतृत्व गुणांचा विकास करून त्यांना जागतिक दर्जाचे सुजाण नागरिक बनविण्यासाठी प्रयत्न करू. आम्ही सर्व विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी व पालक यांच्या अध्ययन व अध्यापन प्रक्रियेतून वरील ध्येय साध्य केले जाईल. हे करतांना गुणवत्ता पद्धती व सातत्याने सुधारणा या कार्यप्रणालीचे अनुकरण केले जाईल.