मुख्याध्यापक संदेश

मुख्याध्यापक संदेश
मुख्याध्यापक श्री महाले शिवदास पुंडलिक

गोखले एज्युकेशन सोसायटी संचलित श्री जयरामभाई हायस्कूल, नाशिक रोड म्हणजे परिसरातील नामांकित शाळा होय. दि. 1 मे 2018 पासून शाळेच्या मुख्याध्यापक पदाची जबाबदारी मा. सर डॉ. मो.स.गोसावी ह्यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पाडतोय. ह्या शाळेत प्रामुख्याने मध्यमवर्गीय व मजूर वर्गातील पालकांचे पाल्य शिक्षण घेतात. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच सुसंस्कारीत विद्यार्थी घडविण्याचे कार्य सहकार्‍यांच्या मदतीने अव्याहतपणे सुरू आहे. शाळेतील विद्यार्थी अभ्यासाबरोबरच खेळामध्ये तसेच सहशालेय उपक्रमात जास्तीत जास्त भाग घेतात आणि यश संपादन करीत आहेत. शालांत परीक्षेचा निकाल वाढविण्यासाठी शिक्षक मेहनत घेत आहेत. स्पर्धा परीक्षा व शिष्यवृत्ती परीक्षांसंबंधी मार्गदर्शन देण्याचे कार्य सुरू आहे. इतर तज्ञ मार्गदर्शकांचे व्याख्यान आयोजित करून शैक्षणिक दर्जा उंचावण्याचे कार्य सुरू आहे. विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शाळेकडून मार्गदर्शन व सहकार्य केले जाते. शाळेचा उज्ज्वल इतिहास व परंपरा जतन करून पुढील काळात शाळा नावरूपास येईल यासाठी मी व माझे सहकारी प्रयत्नशील आहोत.

गोखले एज्युकेशन सोसायटी व पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेची यशस्वी वाटचाल चालत राहील असा आम्हास विश्वास आहे.

श्री महाले शिवदास पुंडलिक
मुख्याध्यापक